तुमच्या घरातली सगळ्यांत अस्वच्छ जागा कोणती?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तुमच्या घरातली सगळ्यांत अस्वच्छ जागा कोणती?

तुमच्या घरातली सगळ्यांत अस्वच्छ जागा टॉयलेट किंवा घरातली फरशी असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. घरातली भांडी घासायची घासणी किंवा स्पंज हा सर्वांत अस्वच्छ असतात, असं अॅरिझोना विद्यापीठाच्या संशोधनात दिसून आलं आहे.

स्पंज किंवा भांडी पुसायचा कपडा सहसा ओलसर असतो. त्यामुळेच त्यावर बॅक्टेरियांची लवकर पैदास होते.

एक चौरस इंच स्पंजवर एक कोटीहून जास्त बॅक्टेरिया असतात, असं संशोधनात समोर आलं आहे. ही संख्या एका टॉयलेटमध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियांपेक्षा जास्त आहे.

टॉयलेट सीटच्या एक चौरस इंच भागात फक्त 50 बॅक्टेरिया असतात. म्हणजेच तुमचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षा 20 हजार पटीने अस्वच्छ असतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)