इअरफोनवर गाणी ऐकणं आरोग्याकरता धोकादायक ठरू शकतं

तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात आणि तेही इअरफोन कानाला लावून ऐकायला आवडतात का? पण आरोग्याकरता धोकादायक ठरू शकतं.

4 मिनिटांपेक्षा अधिक वेळ इअरफोनवर गाणी ऐकणं आरोग्याकरता धोकादायक ठरू शकतं. त्याने कमी ऐकायला येऊ शकतं. (स्रोत: WHO)

पुढे जाऊन ऐकायला येणं बंद होऊ शकतं. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही हेअर ड्रायर वापरत असाल तर तेही धोकादायक आहे.

60 सेंटीमीटर अंतरावर असणारा अलार्मचं घड्याळ 80 डेसिबल इतका ध्वनी निर्माण करतं. त्यामुळे गजराचं घडयाळ किंवा मोबाईल तुमच्या पलंगाजवळ ठेऊ नका.

अति आवाज कानावर पडल्याने ऐकू येण्यात अडथळा निर्माण होतो. हा ऐकू कमी येण्याचं दुसरं मुख्य कारण आहे. वयानुरुप ऐकायला कमी येणं हे पहिलं कारण

(स्रोत:NHS, UK)

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)