शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा तुम्ही पाहिलाय का? BBC EXCLUSIVE

शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा तुम्ही पाहिलाय का? BBC EXCLUSIVE

1928मध्ये पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यात उभारण्यात आला.

पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात हा पुतळा आहे. हा पुतळा उभारण्याची मूळ कल्पना राजर्षी शाहू महाराजांची होती.

छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली. नानासाहेब करमरकर यांनी हा ब्राँझचा अश्वारूढ पुतळा साकारला.

मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)