केवळ तुम्हालाच नाही, जगातल्या 40 टक्के लोकांना आहे अॅलर्जीची समस्या

अॅलर्जी हा आजकाल सर्रास ऐकू येणारा शब्द झाला आहे. धूळ, परागकण, कुत्रे-मांजर किंवा निसर्गातील कोणत्याही गोष्टीची अॅलर्जी आपल्यापैकी अनेकांना असेल.

गेल्याकाही वर्षांत आपली प्रतिकारशक्ती इतकी क्षीण का झाली आहे? शास्त्रज्ञ या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

आधुनिक जीवनशैली हे त्यामागचं एक कारण आहे. शुद्ध पाणी, अँटी-बॅक्टेरिअल पदार्थ सहज उपलब्ध होत असल्यानं आपलं शरीर प्रतिकारशक्ती गमावत आहे.

जीवनशैलीमुळी आपल्या आरोग्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी शास्त्रज्ञांना मदत करणार आहे एक लहानसा कृमी. या हुकवर्मचा (कृमीचा एक प्रकार) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कसा उपयोग करता येईल, यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. लवकरच आपल्याला उत्तर सापडेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)