तलवारी घेऊन शांततेसाठी केलं जाणारं आगळंवेगळं नृत्य

तलवारी घेऊन शांततेसाठी केलं जाणारं आगळंवेगळं नृत्य

पूर्वीच्या काळी युद्धावर जाण्यापूर्वी अफगाण योद्धे तलवारी घेऊन एक विशिष्ट प्रकारचं नृत्य करायचे.

तलवारी घेऊन युद्ध करण्याचा काळ जरी लोटला असला तरी हा नृत्यप्रकार मात्र आपलं अस्तित्त्व आजही टिकवून आहे. 'खट्टक अट्टन' नावानं हे तलवारनृत्य ओळखलं जातं. सध्याच्या परिस्थितीत या नृत्याचा उद्देश बदलला आहे. युद्धापूर्वी जोश निर्माण करण्यासाठी केलं जाणार हे नृत्य, आता शांततेसाठी केलं जात आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)