कोहिनूरपेक्षाही मोठा हिरा, जो निझाम पेपरवेट म्हणून वापरायचा - व्हीडिओ

कोहिनूरपेक्षाही मोठा हिरा, जो निझाम पेपरवेट म्हणून वापरायचा - व्हीडिओ

जगातला सातवा सर्वांत मोठा हिरा आहे जेकब, त्याची किंमत तब्बल 900 कोटी रुपये.

हैदराबादचे सहावे निजाम मेहबूब अली खान पाशा यांनी जेकब नावाच्या व्यापाऱ्याकडून हा हिरा विकत घेतला. पण या हिऱ्याच्या मालकीसाठी खटला सुरू होता. त्यामुळे हैदराबादचे सहाव्या निझामांना तो हिरा डोळ्यात खुपू लागला आणि तो त्यांनी एका ड्रॉव्हरमध्ये ठेवून दिला.

नंतर सातव्या निझामांनी तो आपल्या बुटात तो सापडला.

एकेकाळी सातवे निझाम या हिऱ्याचा वापर पेपरवेट म्हणून करायचे. आणि आज तो राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या एका प्रदर्शनात मांडण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)