दु:खाचा डोंगर पचवून गौरी देशाच्या सेवेत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

गौरी महाडिक दु:खाचा डोंगर पचवून देशाच्या सेवेत

दिवंगत प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी महाडिक लवकरच लष्करी सेवेत रुजू होत आहेत.

दोन वर्षांपूर्वी भारत-चीन सीमेवर प्रसाद यांचं निधन झालं होतं. पती निधनाचं दु:ख असतानाही गौरी यांनी लष्करी सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला.

सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेत त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला. आता त्या चेन्नईला ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रशिक्षणासाठी रवाना होतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)