पाकिस्तानला या मुलीच्या आवाजानं मंत्रमुग्ध केलं आहे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Nescafe Basement: पाकिस्तानच्या या 8 वर्षीय मुलीच्या आवाजानं मंत्रमुग्ध केलंय

पाकिस्तानची 8 वर्षांची हादिया ही 'नेस्कॅफे बेसमेंट' या म्युझिक शोमध्ये गाते. पाकिस्तानात कोक स्टुडिओसारख्या असलेल्या या टीव्ही शोवर तिने भाग घेतल्यानंतर हादिया रातोरात स्टार झाली.

हादियाला डोरेमॉन हे कार्टून खूप आवडतं. हादियाला भविष्यात गायक आणि डॉक्टर व्हायचं आहे.

हादियाचे संगीत शिक्षक सांगतात, "हादिया पहिल्यांदा माझ्याकडे आली तेव्हा तिचा आवाज खूप खडा होता. थोड्या सरावने तिचा आवाजात आणखी खोली येईल, असं मला वाटलं. तिला कितीही वेळ गायला सांगितलं तरी ती न थकता गाते."

ते गंमतीनं पुढं सांगतात, "डोरेमॉनने तिचा आवाज ऐकावा, असं हादियाची इच्छा आहे. पण त्यानं जास्त ऐकू नये. नाहीतर तो ऐकतच बसेल आणि कार्टून करणं सोडून देईल."

व्हीडि:नाजिश जफर आणिफुरकान इलाही, बीबीसी उर्दूसाठी

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)