पाण्यातलं इंद्रधनुष्यः वेगवेगळ्या रंगांनी नटलेली जगातील सर्वांत सुंदर नदी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाण्यातलं इंद्रधनुष्य : वेगवेगळ्या रंगांनी नटलेली जगातली सर्वांत सुंदर नदी - व्हीडिओ

नदी म्हटलं की नितळ, निळशांर पाणी हेच चित्र आपल्या नजरेसमोर येतं. पण कोलंबियामध्ये अशी एक नदी आहे, जिथल्या पाण्यामध्ये हिरव्या, लाल अशा 'इंद्रधनुषी रंगछटा' दिसतात.

Caño Cristales ही कोलंबियातली नदी आहे. या नदीच्या पाण्यामध्ये पिवळा, हिरवा, निळा, काळा आणि मोठ्या प्रमाणावर लाल रंग पहायला मिळतो. खनिज द्रव्यं आणि macarenia clavigera या पाणवनस्पतीमुळं या नदीला असे बदलते रंग प्राप्त झाले आहेत.

या नदीची लांबी 100 किलोमीटर असून पात्राची रुंदी कोठेही 20 किलोमीटरपेक्षा जास्त नाहीये. पण तरीही आपल्या वैविध्यामुळं ही नदी जगातील सर्वांत सुंदर नदी म्हणून ओळखली जातीये.

(व्हीडिओ सौजन्यः डिलन बदोर, बीबीसी ट्रॅव्हल)

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)