तुमचे पंतप्रधान अन्याय करणाऱ्यांच्या बाजूचे आहेत- पाकिस्तानच्या मंत्र्यांचं विधान
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारताचे पंतप्रधान अन्याय करणाऱ्यांच्या बाजूचे - पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी

पाकस्तानातल्या सिंध प्रांतात हिंदू मुलींचं अपहरण करून त्यांचा निकाह लावून देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं.

त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती पाकिस्तानातील भारताच्या राजदुताकडे मागितली.

यानंतर पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी आणि सुषमा स्वराज यांचं ट्वीटरवर वाक् युद्ध रंगलं.

फवाद चौधरी यांनी याचाच धागा पकडत थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)