रवांडा नरसंहार: 'माझ्या मुलाची हत्या करणाऱ्याला मी माफ केलं'

रवांडा नरसंहार: 'माझ्या मुलाची हत्या करणाऱ्याला मी माफ केलं'

रवांडाच्या अॅनी-मरीये या 1994च्या रवांडातल्या नरसंहारातून वाचल्या. पण त्यांचा थोरला मुलगा वाचला नाही. तो 11 वर्षांचा होता.

ए्प्रिल 1994मध्ये शेजाऱ्यानेच त्यांच्यावर हल्ला केला होता. त्याने सुरा काढला आणि माझ्या दोन मुलांचा गळा कापला होता. पण मरीये आणि त्यांचे शेजारी सेलेस्टीन परत त्याच गावात शांततेत राहत आहेत.

रवांडामध्ये 1994मध्ये झालेल्या नरसंहरात 8 लाखाहून जास्त टुटसी आणि मवाळ हुतू लोकांना मारलं गेलं. हे सगळं फक्त 100 दिवसांत घडलं होतं.

सरकारच्या प्रपोगंडामुळे हा नरसंहार घडला होता असं स्थानिक पत्रकार टॉम एनदाहिरो सांगतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)