छत्तीसगडमध्ये मतदानावर हिंसाचाराचं सावट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'नक्षलवाद्यांना विरोध केला तर आमच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार?'

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानावर हिंसाचाराचं सावट पसरलेलं आहे. 9 एप्रिलला संध्याकाळी दंतेवाडा इथे संशियत माओवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भाजप आमदारासह 5 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला.

इथल्या बस्तरमध्ये यापूर्वी हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे इथल्या मतदारांनी चिंता व्यक्त केली आहे. 11 तारखेला बस्तरमध्ये एका जागेसाठी मतदान होत आहे. गृहमंत्रालयाचा दावा असा आहे की गेल्या पाच वर्षांत इथला हिंसाचार कमी झाला आहे. 2011 ते 2018 मध्ये बस्तरमध्ये माओवादी हिंसेत 2 हजार 393 लोक मारले गेलेत. मतदान केंद्र गावांपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर गेली आहेत.

बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांचा बस्तरमधून रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)