पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाय धुतलेल्या त्या महिलाचं आयुष्य कसं आहे?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

नरेंद्र मोदींनी या महिलांचे पाय धुतले, पण त्यांचं आयुष्य बदललं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी यांनी कुंभमेळ्याच्यावेळी उत्तर प्रदेशातल्या 5 सफाई कर्मचाऱ्याचे पाय धुतले होते. त्यांच्यापैकी 2 महिला होत्या. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांनी कुणाचे पाय धुतले आहेत.

त्यानंतर चौबी आणि ज्योती या स्वच्छ भारत योजनेच्या पोस्टर वुमन झाल्या.

बीबीसीनं त्यांच्या घरी जाऊन चौबी आणि ज्योती यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जाणून घेतली.

चौबी युपीच्या बांदा जिल्ह्यातील मझिला गावात राहतात. "काहीच बदल झाला नाही आमच्या आयुष्यात. जसंच्या तसंच आहे सगळं. आम्हाला कुणाचा आधार नसेल तर असंच वाटणार ना," असं चौबी म्हणाल्या.

पंतप्रधानांकडून सन्मान झाल्यानंतर चौबी या सफाई कामगारांच्या पोस्टर वुमन झाल्या आहेत. नवरा, बायको आणि 3 मुलं असं पाच सदस्यांचं त्यांचं कुटुंब आहे. त्या घरी बांबूच्या टोपल्या बनवून काही पैसे कमावतात.

चौबी यांच्याप्रमाणेच पंतप्रधानांनी ज्योती यांचेही पाय धुतले होते. तसं तर त्या गृहिणी आहेत आणि शेतकाम करतात.

इंदिरा घरकुल योजनेतून त्यांचं घर आधीच झालं होतं. ज्योती यांच्या घरी गॅस आहे, पण शौचालय नाही.

पंतप्रधानांनी सन्मान केल्यानंतर चौबी आणि ज्योती यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, पण त्यांच्या आयुष्यात काहीही बदल झालेला नाही, असं त्या म्हणतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)