सरकारच्या योजनेअंतर्गत घर मिळालं पण पुढे काय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मोदी सरकारची पंतप्रधान ग्रामीण घरकुल योजना कितपत यशस्वी?

मीना देवींच्या घरात ना वीज आहे ना पाणी. त्यांच्या घरात वीजेचं मीटर लागलंय पण कनेक्शन नाही. तरीही त्यांना 35 हजार रुपये वीज बील आलं.

"असं का झालं मला माहीत नाही. त्या म्हणतात."

मोदी सरकारने महिलांच्या भल्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या. या योजनांनी देशातल्या महिलांचं आयुष्य सुकर केल्याचा दावाही सरकारकडून केला जातो. त्यातलीच एक योजना म्हणजे पंतप्रधान घरकुल ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या ज्यांना स्वतःची घरं नाहीत, जे वाईट परिस्थितीत राहतात किंवा ज्यांच्याकडे जमीन आहे पण ज्यांच्याकडे घर बांधायला पैसे नाहीत अशा कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेतल्या तरतुदीनुसार घराची नोंदणी घरातल्या महिलेच्या नावावर होते. ही योजना जाहीर झाल्यानंतर दोन वर्षांनी बीबीसीने आग्र्यातल्या पोईया गावात राहणाऱ्या एका लाभार्थी महिलेला भेट दिली. घर मिळाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत तिच्या आयुष्यात काही बदललं का?

मीना देवी सरकारी शाळेत काम करतात आणि शेतात मजूरीही. आपल्या मुलांना वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. "गॅस तर आम्ही वापरत नाही. सिलेंडर संपलं की नवं आणायला पैसे कुठून आणणार?सगळ्यांच्या खात्यात सिलेंडरचे पैसे येतात, पण आमच्या खात्यात एकही रुपया आलेला नाही. चुलीवरच आमचा स्वयंपाक होतो. शौचालयाचा वापर तर कधी केलाच नाही, कारण त्यातून दुर्गंधी येते. तुम्हाला तर दिसतंय की ते कसं बनवलं आहे. शौचालयाचे अर्धे पैसे मिळालेत अर्धे बाकी आहेत," मीना देवींची मोठी मुलगी गुंजन सांगते.

रिपोर्ट - सरोज सिंग

शूट आणि एडिट - पीयूष नागपाल

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)