स्पेशल ऑलिंपिक्समध्ये तीन पदकं जिकणारी स्केटिंग गर्ल

स्पेशल ऑलिंपिक्समध्ये तीन पदकं जिकणारी स्केटिंग गर्ल

अबु धाबीत झालेल्या स्पेशल ऑलिंपिकमध्ये प्रियंकाने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत प्रियंकासहित इतर विकलांग मुलांनी भारताला 368 पदकं मिळवून दिली आहेत.

"प्रियंकाला या खेळाबद्दल आधीपासूनच माहिती होती. तिची शिकण्याची आवड खूप जास्त होती. तिची जिद्द बघून मला माझं बालपण आठवलं," असं तिचे प्रशिक्षक प्रभात शर्मा सांगतात.

तिची आई अनुरीता दिवान सांगतात, "जेव्हा ही जन्मली तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. ती खूप उशिरा बोलायला लागली. तिचं बोलणं समजत नसायचं.

त्यामुळं शाळेतही उशिरा घातलं. एक दिवस ती म्हणाली मम्मी मला भारतासाठी खेळायचं आहे. मग मी त्याच्या तयारीला लागली. तिचं स्वप्न पूर्ण करुया असं ठरवलं."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)