शॉपिंगनंतर तुम्हीसुद्धा कॅरी बॅगसाठी पैसे देता का? - पाहा व्हीडिओ

शॉपिंगनंतर तुम्हीसुद्धा कॅरी बॅगसाठी पैसे देता का? - पाहा व्हीडिओ

चंदीगडच्या ग्राहक मंचाने बाटा कंपनीला कॅरी बॅगसाठी ग्राहकाकडून 3 रुपये घेतल्यामुळे 9 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

चंदीगडच्या दिनेश प्रसाद रतुडी यांनी ग्राहक मंचात तक्रार केली होती.

"प्लास्टिकबंदी झाल्यापासून दुकानदार कॅरीबॅगसाठी ग्राहकांकडून पैसे घेत आहेत. आपण काही सामान खरेदी केलं तर त्यासाठी बॅग द्यायची जबाबदारी दुकानदारांची आहे. यासाठी ग्राहकांकडून पैसे घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. खरं त्या बॅगवर त्यांच्याच कंपनीचं नाव असतं, त्यामुळे त्यांचाच प्रचार होतो. म्हणजे एक प्रकारे ग्राहक कंपनीच्याच प्रचारासाठी पैसे देतोय. विकत घेतलेलं सामान ठेवायला कॅरी बॅग देणं कंपनीची जबाबदारी आहे. यासाठी ग्राहकांकडून पैसे घेणं चुकीचं आहे," असं ग्राहक हक्क कार्यकर्त्या पुष्पा गिरिमाजी यांनी सांगितलं.

व्हीडिओ शूट आणि एडिट - कमलेश, बुशरा शेख

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)