World Earth Day: एक इंजिनिअर जेव्हा नोकरी सोडून तलाव साफ करू लागतो - व्हीडिओ

World Earth Day: एक इंजिनिअर जेव्हा नोकरी सोडून तलाव साफ करू लागतो - व्हीडिओ

रामवीर तंवर इंजिनियर आहेत. त्यांनी आपली नोकरी सोडून ग्रेटर नॉयडातील तलावांना संजीवनी मिळवून देण्याचं काम हाती घेतलंय.

दिल्लीजवळच्या ग्रेटर नॉयडातल्या एका तलावाची स्थिती 2016मध्ये खूप वाईट होती. मात्र तीन वर्षांत रामवीर तवंत यांनी त्या तलावाचं रूपडं पालटलं आहे.

"ज्या ठिकाणी आम्ही खेळायचो, मातीचा सुगंध यायचा, तिथं आता दुर्गंधी झाली हीत, तलावाचं डंपिंग ग्राउंड झालं होतं," असं ते सांगतात.

तलावात एवढी दलदल झाली होती की माणसं आत जाऊन साफसफाई करू शकत नाही, असं ते सांगतात.

केंद्रीय भूजल बोर्डच्या आकडेवारी (2013-2017) गेल्या पाच वर्षात ग्रेटर नॉयडामधली भूजल पातळी 3.61 मीटरनी घटली आहे.

हळूहळू रामवीर यांच्या मोहिमेला लोकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे.

रामवीर यांनी गेल्या पाच वर्षांत कचऱ्याने भरलेले 10 तलाव साफ केले आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)