पश्चिम बंगाल : "आम्हाला काही कळायच्या आत त्यांनी आमचं घर जाळून टाकलं"
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लोकसभा निवडणूक : 'आम्हाला काही कळायच्या आत; त्यांनी आमचं घर जाळून टाकलं'

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय हिंसाचाराच्या घटना सतत कानावर पडत आहेत. इथल्या राजकीय हिंसाचारामागे धार्मिक तेढ असल्याची उदाहरणंही पुढे आली आहेत. यामुळे काहींना जीवही गमवावे लागलेत.

"मी घरात काम करत बसलो होतो आणि तेव्हा काही लोक घरात घुसले. आम्हाला काही कळायच्या आत त्यांनी आमचं घर जाळून टाकलं," असं पीडित काशिनाथ मलाय यांनी सांगितलं. एका धार्मिक वादानंतर उसळलेल्या दंगलीत त्यांचं हे नुकसान झालं.

धर्म आणि राजकारणावरून पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय चाललंय याचा आढावा बीबीसीचे प्रतिनिधी नितिन श्रीवास्तव यांनी घेतला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)