यवतमाळच्या ग्रामीण भागात दुष्काळामुळे लोक पीत आहेत विषारी पाणी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

यवतमाळ: दुष्काळग्रस्त यवतमाळात विषारी पाण्यामुळे मुलांचे दात खिळखिळे

दुष्काळाच्या झळांमुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. पाणी नसल्याने काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. तर काहींना गावही सोडावं लागलं आहे. मात्र ज्यांना यातलं काहीच शक्य नाही त्यांनी मिळेल ते पाणी प्यायला सुरुवात केली आहे.

यवतमाळमधल्या रुईपेंड गावातले लोक पिण्यासाठी अशुद्ध असलेलं पाणी पीत आहेत. गावात शासनाने पिण्यासाठी अयोग्य पाणी देणाऱ्या हँडपंपांवर लाल रंगाचे पट्टे मारले आहेत. मात्र, ग्रामस्थ पर्याय नसल्याने हेच पाणी पीत आहेत. या पाण्यात फ्ल्युराईड, आर्सेनिक, सिलिका, कॅडमिअम सारखे विषारी घटक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्याने गावातल्या लहान मुलांना गंभीर आजार होत आहेत.

बीबीसीचे प्रतिनिधी नितेश राऊत यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)