ओडिशातील चक्रीवादळाच्या दलित पीडितांना 'अस्पृश्य' म्हणून वागणूक
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

फणी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या काही दलित कुटुंबांना भेदभावाचा फटका सहन करावा लागला.

ओडिशामध्ये फणी चक्रीवादळात मरण पावलेल्यांचा आकडा आता 64 पर्यंत गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेकडो कुटुंबांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे.

पण ही मदत मिळण्यासाठी काही दलित कुटुंबाना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

बेघर झालेल्या लोकांना सरकारी मदत केंद्रात तसंच सुरक्षित ठिकाणी आश्रय दिला जातोय. पण बिडिपोडिया गावात दलितांना या आपत्तीच्या वेळी भेदभावाची वागणूक मिळाली असं समोर आलंय. सरकारी केंद्रांमध्ये काहींना प्रवेशच मिळाला नाही.

बीबीसीचे प्रतिनिधी फैसल महम्मद यांचा हा खास रिपोर्ट.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)