उत्तर कोरियात भीषण दुष्काळ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

उत्तर कोरियात भीषण दुष्काळ, टीव्हीवर मात्र सारंकाही हिरवेगार - पाहा व्हीडिओ

उत्तर कोरिया या शतकातला सर्वाधिक भयंकर दुष्काळ अनुभवत आहे. पण मीडियामध्ये तो क्वचितच दिसतो.

अन्नधान्याबाबत आणीबाणीसदृशस्थिती असल्याचं UNचं म्हणणं आहे. पण मीडियामध्ये त्याची वाच्यताही होताना दिसत नाहीये.

कोरियाच्या सरकारी टीव्हीवरील वृत्तांमध्ये हिरव्या पिकांची आणि वाहत्या पाण्याची चित्र दाखवण्यात येत आहेत.

1917 पासून पाऊस सतत कमी होत आहे. 1990 मध्ये दुष्काळामुळे हजारोंना जीव गमवावा लागला होता, तेव्हाही हे संकट टीव्हीवर कुठेही दिसलं नव्हतं.

आताही लोकांना तोपर्यंत दुष्काळाची कल्पना देण्यात आली नाही, जोपर्यंत UN आणि दक्षिण कोरियाने धोक्याचा इशारा दिला नव्हता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)