साखर कारखाना बंद झाला तरी उसतोड कामगार घरी परतला नाहीये...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दुष्काळ: साखर कारखाना बंद झाला तरी उसतोड कामगार घरी परतला नाही-पाहा व्हीडिओ

दरवर्षी एप्रिल महिन्यात हे लोक आपापल्या गावी परत जातात. मात्र यंदा मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे त्यांनी बारामतीतच थांबणं पसंत केलंय.

ऑक्टोबर ते एप्रिल हा ऊसतोडणीचा हंगाम असतो. या दरम्यान सोमेश्वर साखर कारखान्यावर जवळपास 3 हजार ऊसतोड कामगार येतात. पण त्यांच्यापैकी बहुतेकजण माघारी गेले नाहीत.

मराठवाड्यातून सर्वात जास्त ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. यामध्ये बीड जिल्ह्यातून स्थलांतरित होणाऱ्या कामगारांचं प्रमाण अधिक आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)