रायगडावर मर्दानी खेळ सादर करणारी कोल्हापूरची रोहिणी वाघ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शिवराज्याभिषेक: रायगडावर तलवारबाजी करणारी कोल्हापूरची 'मर्दानी'

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा असे साहसी खेळ सादर करण्यात आले. हे मर्दानी खेळ पाहण्यासाठी देशभरातील आखाडे सहभागी झाले होते.

त्यावेळी कोल्हापूरच्या रोहिणी वाघनेही साहसी खेळ सादर केले. लहानपणापासून मर्दानी खेळ खेळणारी रोहिणी सध्या त्याचं प्रशिक्षणही देते.

आपल्या मुलीने स्वावलंबी व्हावं, असं रोहिणी यांच्या आईवडिलांना वाटतं. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येक मुलीने मर्दानी खेळ शिकणं गरजेचं असल्याचं रोहिणीला वाटतं

शिवाजी महाराजांच्या काळात महिला युद्धकलेत निपुण होत्या पण आजच्या काळात स्वसंरक्षणासाठी युद्धकला शिकणं ही काळाची गरज आहे असं रोहिणी यांनी बीबीसीला सांगितलं.

युद्धकला शिकल्यामुळे तुम्हाला स्वसंरक्षणासाठी नेहमी तयार असल्याची जाणीव होते. त्यामुळं महिला मुलींना वेळी अवेळी येणाऱ्या संकटांचा सामना करता येतो असं रोहिणीला वाटतं.

व्हीडिओ - स्वाती पाटील-राजगोळकर

एडिटिंग - आशिष कुमार

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)