महिला फिफा वर्ल्ड कप
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सत्तरच्या दशकापर्यंत महिलांना फुटबॉल खेळायला का होती बंदी?

यंदाचा महिलांचा फिफा वर्ल्ड कप जून-जुलैत फ्रान्समध्ये होत आहे. यात 24 टीम सहभाग घेतील.

पुरुषांची स्पर्धा सुरू झाल्याच्या 61 वर्षांनंतर म्हणजेच 1991ला ही स्पर्धा सुरू झाली. सत्तरच्या दशकापर्यंत महिलांवर फुटबॉल खेळण्याची बंदी होती.

आतापर्यंत USA, जपान, नॉर्वे आणि जर्मनीनं वर्ल्ड कप जिंकला आहे.

TV आणि स्टेडियममध्ये या स्पर्धा पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. आतापर्यंत 9 लाख तिकिटांची विक्री झाली आहे. यावेळची पहिल्या, उपांत्य आणि अंतिम सामन्यांची तिकिटं 48 तासातच संपली आहेत.

या आधीचा म्हणजे 2015चा FIFA महिला वर्ल्ड कप कॅनडात झाला होता. त्यावेळी जगभरात 50 कोटी लोकांनी हे सामने पाहिले होते.

USA आणि जपानची मॅच अमेरिकेत सर्वाधिक लोकांनी पाहिली होती. त्यावेळी 2.5 कोटीहून अधिक जणांनी ती मॅच पाहिली.

USAच्या विजयी टीमला 20 लाख डॉलरचं बक्षीस मिळालं होतं. यावेळी ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. पण विजयी पुरुष टीमला मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम फार कमी आहे. यामागे काय कारण असू शकतं हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)