दुष्काळ: गुजरातच्या बनासकांठामध्ये टँकरवाचून अडतायत लग्नं
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बनासकांठामध्ये भीषण पाणीटंचाई, टँकरच्या उपलब्धतेवर ठरतात लग्नांचे मुहूर्त

गुजरातमधल्या काही भागात भीषण पाणीटंचाई आहे. या टंचाईचा फटका इथल्या लग्नसराईलाही बसला आहे.

उत्तर गुजरातमधल्या बनासकांठा जिल्ह्याला टँकरशिवाय पाण्याचा दुसरा स्रोत नाही. त्यामुळे गावातल्या लग्नांचे मुहूर्तही टँकरच्या उपलब्धतेवर ठरत आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेपासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावांमधली परिस्थिती सांगतायत बीबीसीचे प्रतिनिधी पार्थ पंड्या.

वाचा संपूर्ण बातमी इथे - या गावात ज्योतिषी नाही, पाण्याचे टँकर ठरवतात लग्नाचा मुहूर्त

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)