समरीन अली : 14 लाख सब्सक्रायबर असलेली यूट्यूब स्टार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

समरीन अली: 14 लाख सब्सक्रायबर असलेली यूट्यूब स्टार - पाहा व्हीडिओ

14 वर्षांची समरीन यूट्यूबवर स्वत:चं चॅनेल चालवत आहे. तिचे 14 लाख सब्सक्रायबर आहेत.

2017मध्ये तिनं चॅनेल सुरू केलं. ती वयाच्या 6व्या वर्षापासून ऍक्टिंग करत आहे.

ती सांगते, “वयाच्या 6व्या वर्षापासून मी ऍक्टिंग करत आहे. माझ्या घरी वेब कॅम होता, मी त्याच्यासमोर बाहुली घेऊन अभिनय करत असे. जसं की, बाहुली डॉक्टरकडे जात आहे. मला अभिनयाची खूप आवड होती. माझ्या भावाने यूट्यूब चॅनेल काढलं, तेव्हा मीसुद्धा असं करू शकते, असं त्यानं सांगितलं. बरेच दिवस माझे फक्त 20 सबस्क्राईबर होते.”

तिची मोठी बहीण महजबीन अली या व्हीडिओसाठी लिखाण आणि दिग्दर्शन करते. तिच व्हीडिओ शूट आणि एडिट करते.

महजबीन अली सांगतात, “सुरुवातीला मला एडिटिंग येत नव्हतं. मला जमणार नाही, असं वाटायचं. पण, 3 दिवसांत मी सर्व काही शिकले आणि आता तर डोळे बंद करून मी हे काम करते. कधीकधी आमची भांडणंही होतात. समरीन आज तुझा लूक असा असायला हवा, असं मी सांगितलं आणि तिला ते पटलं नाही, तर मग आमचं भांडण होतं.”

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)