बंगालमध्ये डॉक्टरांचा संप सुरूच, देशभर पडसाद
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बंगालमध्ये डॉक्टरांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच, देशभर पडसाद

देशभरात डॉक्टरांच्या विविध संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारत बंगालमध्ये संपावर गेलेल्या डॉक्टरांना पाठिंबा दिला आहे.

सोमवारी, म्हणजे 11 तारखेला कोलकात्याच्या नील रतन सरकार हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकांनी दोन कनिष्ठ डॉक्टर्सना मारहाण केली.

यानंतर डॉक्टरांनी अधिक सुरक्षेची मागणी करत संप पुकारला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांनी संप मागे न घेतल्यास निवासी आणि इंटर्न डॉक्टर्सना हॉस्टेलमधून काढून टाकण्याचा आणि बडतर्फ करण्याचा इशारा दिला होता.

बंगालमध्ये शुक्रवारी 43 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत, ज्यामुळे हा संप चिघळत चालल्याचं स्पष्ट होत आहे. ममता बॅनर्जींनी भाजप आणि डावे पक्ष मिळून या संपाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला आहे.

दिल्लीत AIIMS मधील डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची भेट घेत आपल्या मागण्या सादर केल्या. डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही ममता बॅनर्जींशी बोलण्याचं आणि या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)