या जलमार्गाचा थेट संबंध तुमच्याशी आहे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

या जलमार्गाचा थेट संबंध तुमच्याशी आहे - पाहा व्हीडिओ

होर्मूझचा जलमार्ग हा पृथ्वीवरील एक महत्त्वाचा जलमार्ग आहे. त्याचा थेट संबंध पेट्रोलची किंमत आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी आहे.

अमेरिकेनं इराणबरोबरचा अणू करार तोडला आणि हे क्षेत्र अस्थिर झालं.

अमेरिकेनं इराणवर निर्बंध लादले. तेलाच्या व्यापारावर बंधनं आणली. विमानवाहक युद्धनौकेला इराणजवळच्या समुद्रात पाठवलं.

आता या जलमार्गाला लष्करी छावणीचं रूप आलंय. या घटनेचा जगावर परिणाम होत आहे.

या जलमार्गात कोणताही अडथळा म्हणजे तेलाच्या किंमतींना उधाण आणि जागतिक अर्थव्यवस्थेत डळमळ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)