काय आहे सॅँडविच जनरेशन?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सॅँडविच जनरेशन: दोन पिढ्यांच्या अडकलेल्या 30-50 वयोगटाची गोष्ट - व्हीडिओ

30-50 वयोगटातले अनेक लोक आपली मुलं आणि आईवडिलांचा एकत्र सांभाळ करतात. कसं आहे या जनरेशनचं आयुष्य?

दीपा जोशी सांगतात, "तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आम्ही लोक सँडविच बनलो आहोत. आम्हाला ऑफिसमध्ये पण काम करावं लागतं, मुलांनाही सांभाळावं लागतं आणि मोठ्यांना पण. आम्ही ऑफिसमध्ये कामात व्यग्र असलो तर त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्यात दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण होते."

पूजा नरुला यांच्या मते, "सर्वांसाठी वेळ काढणं खूप अवघड होतं. कधी कधी मुलांची परीक्षा सुरू असते आणि मोठे आजारी पडतात. त्यांना आमची जास्त गरज असते पण तेव्हा ठरवणं खूप अवघड होतं की कुणाला प्राधान्य द्यावं.

कधी-कधी सुटीला फिरण्याची जागा ठरवणं अवघड जातं. आमची आवड काही वेगळी असते पण त्यांची काहीतरी वेगळी. अशा परिस्थितीत गोंधळ उडतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)