या मुली
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

JEE, AIIMS, NEET परीक्षा एकाच वर्षी पास करणाऱ्या स्तुती - व्हीडिओ

स्तुतीनं JEEच्या मुख्य परीक्षेत 99.916 पर्सेंटाईल मिळवले. AIIMS मेडिकल परीक्षेत 27वा रँक. तर NEET मध्ये 71वा रँक मिळवला आहे.

"दहावीत मी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा पास केली, जी दोन टप्प्यात होते. त्यांनतर मी IISC बंगळुरूची KVPY ही प्रवेश परीक्षा पास केली. यावर्षी मी JEEच्या मुख्य परीक्षेत 99.916 पर्सेंटाईल मिळवले. AIIMS मेडिकल परीक्षेत माझा 27वा रँक होता तर NEET मध्ये 71वा रँक आहे," असं स्तुती सांगते.

स्तुतीने या सगळ्या परीक्षांसाठी टाईम मॅनेजमेंट कसं केलं? असं विचारलं असात ती म्हणते, "मी कधीच दिवसाचं टाईमटेबल बनवलं नाही. माझ्या मनाप्रमाणं अभ्यास केला. शाळा, सेल्फ स्टडी आणि कोचिंग क्लास असा दररोजचा 12-13 तास अभ्यास व्हायचा. कंटाळा आला की मी टॉम अँड जेरी, किंवा यूट्यूबवर कुकिंग व्हीडिओ पाहायचे. आणि तिसरीपासून मी भरतनाट्यमसुद्धा शिकतेय."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)