टिक-टॉकमुळे ही मुलगी जेव्हा रातोरात स्टार झाली
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

टिक-टॉकमुळे नेपाळची ही मुलगी जेव्हा रातोरात स्टार झाली

रेश्मा घिमिर ही नेपाळची आहे. 23 वर्षांची रेश्मा नर्स म्हणून करते. टिक-टॉकमुळे ती रातोरात स्टार झालीय.

रेश्मानं 2016पासून टिक-टॉक व्हीडिओ बनवायला चालू केलं.

रेश्मा सांगते, "तेव्हा लोक मला ओळखू लागले. सुरुवातीचा माझा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. लोक मला टिक-टॉकवर फॉलो करू लागले. त्या व्हीडिओनं माझा उत्साह वाढला.आता मी अनेक व्हीडिओ बनवू लागलेय."

टिक-टॉकवर रेश्माचे 8 लाख फॉलोअर्स आहेत. नेपाळमध्ये ती खूप लोकप्रिय आहे.

"व्हीडिओला लाईक, कमेंट्स नाही आल्या तर मी स्वत: निराश होते. पण ते फक्त काही काळासाठी असतंय. अभ्यास सोडून आपण सोशल मीडियावर वेळ नाही वाया नाही घालवायला पाहिजे. प्रत्येक व्हीडियोपासून जास्त अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे," असंही रेश्मा सांगते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)