डोकं जोडलेल्या बहिणींना वेगळं करण्याची गोष्ट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सयामी जुळ्या बहिणींना वेगळं करण्याची गोष्ट - पाहा व्हीडिओ

पाकिस्तानातल्या 21 महिन्यांच्या दोन मुलींवर नुकतीच इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

या दोघींचं डोकं एकमेकांना जोडलेलं होतं.

"यासारखी उदाहरणं खूप दुर्मिळ असतात. यासारखं उदाहरण आम्ही पूर्वी पाहिलेलं नव्हतं," असं डॉ. ओवेझ जीलानी सांगतात.

डॉक्टरांनी या मुलींना वेगळं करण्यासाठी 3 D आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी पद्धतीची मदत घेतली.

सध्याच्या एका कवटीपासून दोन कवट्या तयार करण्यात आल्या. आता या मुली आनंदानं आयुष्य जगत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)