सैनिक टाकळी: या गावातल्या प्रत्येक घरातील सदस्य सैन्यात आहे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कारगिल विजय दिवस : घरातील एका तरी मुलाला सैन्यात पाठवणारं गाव

कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी गावाला शौर्याची परंपरा आहे. या गावातल्या प्रत्येक घरातील एक तरी सदस्य सैन्यात आहे.

कारगिल युद्धाचा काळ हा खडतर काळ होता. पण शत्रुवर विजय मिळवणं हेच ध्येय होतं असं या युद्धात लढलेल्या जवानांना वाटतं. निसर्गाशी दोन हात करत विरोधी सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय सैनिकांनी जीवाची बाजी लावली होती.

या गावातील 18 जवान वेगवेगळ्या युद्धांत शहीद झाले आहेत.शहीद जवांनाच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावात स्मारक बनवण्यात आले आहे.

सैनिकी परंपरेमुळे टाकळी गावाची ओळख 'सैनिक टाकळी' अशी बनली.

सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी गावात सैनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

व्हीडिओ शूट - स्वाती पाटील-राजगोळकर

एडिटिंग - आशिष कुमार

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)