महालक्ष्मी एक्सप्रेसमधील 700 प्रवाशांची सुखरुप सुटका
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

महालक्ष्मी एक्सप्रेस : 'आमच्या बोगीमध्ये साप घुसला होता' - पाहा व्हीडिओ

बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील 700 प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं आहे.

या सर्वांना इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, अडकून पडलेल्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ट्रेनमधल्या एक प्रवासी, प्रज्ञा सांगतात, "आम्ही अडकून पडलो होतो, खायला काी नव्हतं आणि मुलं सतत रडत होती."

तर दुसऱ्या प्रवासी आशा भारूडे म्हणाल्या की त्यांच्या बोगीमध्ये साप घुसला होता."

सर्व प्रवासी सुखरुप असल्याचंही पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे गेल्या बारा तासांपासून बदलापूर आणि वांगणीदरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)