वेडिंग फोटोशूटची तरुणांमध्ये क्रेझ का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

प्री-वेडिंग फोटोशूट: सोशल मीडियावरील लाईक्ससाठी की आनंदी क्षणांची साठवण - पाहा व्हीडिओ

या व्हीडिओत अभिजीत आणि नयनाचं वेडिंग फोटोशूट आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे.

या व्हीडिओत अभिजीत आणि नयनाचं वेडिंग फोटोशूट आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे.

एका खोल खड्डयात हे फोटो शूट करण्यात आलं आहे. फोटोग्राफरनं गार्डनमध्ये हा खड्डा खणला आहे.

या शूटसाठी संपूर्ण एक दिवस लागतो. या प्रकारच्या फोटोशूटसाठी 1 लाख रुपये खर्च येतो.

मी माझ्या नातेवाईक आणि मित्रांचे फोटोशूट पाहिले आहेत. प्रत्येक फोटोत एकाच प्रकारचे हाउसबोट आणि बीच दिसतात. "आमचं फोटोशूट वेगळं असावं, असं मला वाटत होतं. ज्यात थोडा रोमान्स असेल. त्यामुळे असं फोटोशूट करण्याचं आम्ही ठरवलं," असं या जोडप्याचं म्हणणं आहे.

भारतात सध्या महाग फोटोशूट लोकप्रिय आहेत. असं फोटोशूट करून जोडप्याला लोकांचं ध्यान आकर्षित करायचं असतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)