सीरियात युद्ध गुन्हा घडल्याचे पुरावे बीबीसीच्या तपासात उघड
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सीरियात घडला युद्ध गुन्हा: बीबीसीच्या तपासात उघड - व्हीडिओ

सीरियातल्या इडलिब शहरात क्षेपणास्त्र मारा करताना युद्धकाळातले गुन्हे घडल्याचे पुरावे बीबीसी न्यूज अरेबिकने केलेल्या तपासात समोर आले आहेत.

या क्षेपणास्त्र माऱ्यात 39 जण ठार झाले होते.

हा मारा करताना डबल टॅप हे तंत्र वापरण्यात आलं. सुरुवातीला झालेल्या हल्ल्यानंतर त्याच विमानाने थोड्या वेळाने पुन्हा हल्ला केला आणि पहिल्या हल्ल्यानंतर तिथे आलेल्या बचाव पथकाला लक्ष्य करण्यात आलं.

मार्केटवर झालेल्या या हल्ल्यात आपला हात असल्याचं वृत्त रशियाने फेटाळून लावलं आहे.

सीरियन सरकारने याबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

या प्रकरणात नेमकं काय घडलं आणि कोण जबाबदार असू शकतं, याबाबत बीबीसी अरेबिकचे नादेर इब्राहिम यांनी शोध घेतला.

नवल मगाफी यांचा हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)