दृष्टिहीन व्यक्तीही अनुभवू शकतात मोनालिसाचं हास्य
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दृष्टिहीन व्यक्तींना कलेचा आनंद घेता यावा म्हणून 3D फोटोवर्क्सचा उपक्रम

दृष्टिहीन व्यक्ती उत्तमोत्तम कलाकृतींच्या आनंदापासून वंचित राहू नयेत म्हणून 3D फोटोवर्क्स या कंपनीनं अभिनव उपक्रम राबवला आहे.

कलासंग्रहालयात चित्रं सहसा काचेच्या पेटीत ठेवलेली असतात किंवा भिंतीवर टांगलेली असतात. त्यामुळे दृष्टिहीनांना कलेचा आनंद घेता येत नाही. त्यांना त्या कलाकृतीबद्दल माहिती देणारा ब्रेलमधला मजकूर किंवा मार्गदर्शन करणारे व्हीडिओही उपलब्ध नाहीत.

त्यामुळेच 3D फोटोवर्क्सनं जगप्रसिद्ध कलाकृतींच्या हाताळता येतील अशा प्रतिकृती बनवल्या आहेत. यामध्ये मोनालिसा, व्हॅन गॉगचं डॉक्टर गॅजेट तसंच अन्य कलाकृतींचा समावेश आहे.

या प्रयोगामुळे दृष्टिहीन व्यक्तिंना स्पर्शातून कलाकृती अनुभवता येतील. पाहा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)