हजारो रोहिंग्यांना हुसकावल्यानंतर म्यानमारनं रोहिंग्यांच्या घरांचं नामोनिशाण नकाशावरूनही पुसलं... बीबीसीचा ग्राऊंड रिपोर्ट...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

म्यानमार: हजारो रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारला का जायचं नाही परत?

म्यानमार सरकारच्या कारवाईला घाबरून तिथल्या रोहिंग्या मुस्लिमांनी देशातून पळ काढून बांगलादेशचा आसरा घेतला.

आणि तेव्हापासून तिथं त्यांच्यासाठी उभारलेल्या छावण्यांमध्ये ते अडकून पडलेत. मागच्या महिन्यापासून त्यांना परत म्यानमारला पाठवण्यासाठी बऱ्याच योजना आखण्यात आल्या.

पण, सुरक्षिततेच्या कारणावरून रोहिंग्यांनी तिथे जायला नकार दिला. म्यानमार सरकारच्या म्हणण्यानुसार, रोहिंग्या मुस्लिमांना परत आणण्यासाठी त्यांचं सरकार कटीबद्ध आहे.

पण, बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांना असं आढळलं की राखाईन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांच्या वसाहतीच्या खुणा पुसून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांच ग्राऊंड रिपोर्ट बघूया...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)