अफगाणिस्तानात 31 दिवसांत हिंसाचाराचे 2 हजार 307 बळी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अफगाणिस्तानात 31 दिवसांत हिंसाचाराचे 2 हजार 307 बळी

अफगाणिस्तानात नव्याने सुरू झालेला संघर्षाविषयीची. अठरा वर्ष सुरू असलेल्या युद्धाला विराम देण्यासाठी अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतताचर्चा सुरू असताना अफगाणीस्तानात नव्याने हिंसाचार उफाळून आला. वाटाघाटी चालू असतानाच्या शेवटच्या आठवड्यात देशात जितके लोक मारले गेले त्याचा बीबीसीच्या टिमने पाठपुरावा केला.

संपूर्ण ऑगस्टमध्ये नोंदवलेली ही आकडेवारी बीबीसी आहे, त्यानुसार अफगाणिस्तानामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आणि देशातल्या प्रत्येक भागाला त्याचा फटका बसलाय.

एक नजर मृत्यूंच्या आकडेवारीवर टाकूया. ऑगस्ट महिन्यात 2 हजार 307 मृत्यू झाल्याचं समोर आलंय. म्हणजेच दररोज सरासरी 74 लोकांचा हिंसक हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला.

शांतता चर्चा सुरू असताना तालिबानी बंडखोर मोठ्या संख्येने मारले गेले. ही संख्या निम्म्याच्या जवळ जाणारी आहे. पण सामान्य नागरिकही या हिंसाचारात भरडले गेले. एका महिन्यात 473 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)