काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं जातंय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

काश्मीर: जम्मू-काश्मीर पोलीस अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतंय? - पाहा व्हीडिओ

भारत प्रशासित काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलं जात असल्याचे अनेक आरोप बीबीसीसमोर आले आहेत. राजकीय नेते, व्यापारी आणि कार्यकर्ते अशा ताब्यात घेतल्या गेलेल्या 3,000 लोकांमध्ये त्यांचाही समावेश आहे.

भारतीय लष्कराने बीबीसीला सांगितलं की जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतची त्यांची संयुक्त कारवाई गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी आहे आणि ती आफस्पा कायद्याखाली केली गेली आहे. सुप्रीम कोर्टाने आज जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या ज्युविनाईल जस्टीस कमिटीला लहान मुलांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलं जात असल्याच्या आरोपांची शहानिशा करून एका आठवड्यात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)