बांगलादेशमध्ये विद्यार्थ्याच्या हत्येनंतर संताप
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

विद्यार्थ्याच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये संताप आणि निदर्शनं

बांगलादेशमध्ये अबरार फहद या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणावर निदर्शनं होतायत.

शेख हसीना यांच्या सरकारवर सोशल मीडियातून टीका केल्यानंतर काही दिवसांतच त्याची खुद्द विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये हत्या झाली. सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांवर अबरारची हत्या केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 13 लोकांना अटक झाली आहे. या हत्येनंतर सुरू झालेल्या निदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांच्या राजकारणावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे.

बांलगादेशच्या पंतप्रधानांनी विद्यार्थी राजकारणात हत्येला स्थान नाही अशी प्रतिक्रिया या घटनेवर दिली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)