काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे मुलांना अटक?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे अटक? - पाहा व्हीडिओ

काश्मीरमध्ये 144 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याचं जम्मू-काश्मीर पोलिसांनी नुकतंच सुप्रीम कोर्टासमोर मान्य केलं.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी कोर्टाला हेही सांगितलं की आवश्यक ती सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. ऑगस्टमध्ये काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर अल्पवयीन मुलांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका याचिकेवर पोलिसांनी कोर्टात हे स्पष्टीकरण दिलं होतं.

बीबीसीचे प्रतिनिधी आमिर पीरझादा काही अल्पवयीन मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना भेटले. बीबीसीने त्यांची ओळख गुप्त ठेवलीये कारण यंत्रणा त्रास देतील अशी या कुटुंबांना भीती वाटतेय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)