निवडणूक महाराष्ट्राची, मग काश्मीर आणि 370 चा मुद्दा का गाजतोय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काश्मीर आणि कलम 370चा मुद्दा का गाजतोय?

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी संपून 21 ऑक्टोबरला मतदान होईल.

राज्यातल्या 288 जागांवरच्या उमेदवारांचं भवितव्य मतदार राजा EVMमध्ये बंद करेल. पण प्रचारादरम्यान राजकीय पक्ष आणि उमेदवार मतदारांच्या मुद्द्यांबद्दल किती बोलले? त्यांनी मतदारांना आपलंसं वाटणाऱ्या मुद्द्यांवर किती भर दिला आणि पक्षीय अजेंड्याद्दल किती चर्चा झाली?

गेल्या काही दिवसांत प्रचाराचा जो धुरळा उडाला तो कोणत्या मुद्द्यांवर? महाराष्ट्राच्या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांपेक्षा काश्मीर, कलम 370 हेच मुद्दे जास्त गाजताना दिसले. या सगळ्या मुद्द्यांकडे मतदार राजा नेमकं कसा बघतो हे जाणून घेण्याचा बीबीसी मराठीनं प्रयत्न केला...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)