‘आधी शेतकरी नवऱ्यानं आत्महत्या केली, आता पावसामुळे पीक गेलं’
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

‘आधी शेतकरी नवऱ्यानं आत्महत्या केली, आता पावसामुळे पीक गेलं’ - पाहा व्हीडिओ

राधाबाई राऊत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील पळशी गावात राहतात. त्यांच्या शेतकरी पतीनं 2015मध्ये आत्महत्या केली.

आता अवकाळी पावसामुळे त्यांच्यावर संकट ओढवलं आहे. शेतातील पीक त्यांच्या हातातून गेलं आहे.

“मला 35 गुंठे वावर आहे, त्यात मका पेरला होता. 7 किलो बी. पण त्या मक्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता खर्च फिटत नाही. कारण मका सडला आहे. शेतीत थोडाफार 10-15 हजाराचा माल निघत होता. पण यावर्षी ते पण नाही. पाऊस पडायच्या आधी चांगलं होतं. पावसानं सगळी घाण केली. जिथं 10 क्विंटल व्हायचे, तिथं आता 4 क्विंटलही होत नाही,” असं राधाबाई राऊत यांनी सांगितलं.

पावसामुळे त्यांच्या घराची भिंतही ओली झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)