पाणी टंचाई: 100 गावातल्या महिलांनी एकत्र येऊन पाणी प्रश्न सोडवला तेव्हा...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाणी टंचाई: 100 गावातल्या महिलांनी एकत्र येऊन पाणी प्रश्न सोडवला तेव्हा...

पुरुषांच्या मदतीची वाट न बघता बुंदेलखंड प्रदेशातल्या महिला विहिरी खोदत आहेत, तलाव बांधत आहेत.

बुंदेलखंड हा उत्तर भारतातला दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो. गेल्या 20 वर्षांत या प्रदेशात 13 वेळा दुष्काळ पडला आहे.

पाणीटंचाईचा सगळ्यांत मोठा फटका हा तिथल्या महिलांना बसत आहे. पण इथल्या जवळजवळ 100 गावातल्या महिला एकत्र आल्या आहेत. त्यांना 'जल सहेली' किंवा 'जल मैत्रिणी' म्हणून ओळखलं जातं.

गावातल्या विहिरी बांधणं, तलाव खोदणं, जुने तलाव साफ करणं अशी सगळी कामे महिला एकत्र येऊन करतात. त्यांच्या यशाची कहाणी नक्की पाहा.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)