या महिलेकडे आहे नो कास्ट नो रिलीजन सर्टिफीकेट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भेटा कोणताही अधिकृत धर्म-जात नसणाऱ्या महिलेला

‘नो कास्ट, नो रिलिजन’ प्रमाणपत्र मिळवणाऱ्या स्नेहा देशातल्या पहिल्या महिला आहेत. अर्थात हे प्रमाणपत्र मिळवणं स्नेहासाठी सोपं नव्हतं.

त्यांनी यासाठी सलग 7 वर्षं लढा दिला.

सरकार कास्ट सर्टिफिकेट देऊ शकतं, पण ‘नो कास्ट’ सर्टिफिकेट नाही, असं त्यांना सांगण्यात आलं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 5 फेब्रुवारी 2019ला त्यांना ‘नो कास्ट सर्टिफिकेट’ देण्यात आलं.

आज त्यांना तीन मुली आहेत. त्या तिघींनाही जातीधर्माशिवाय वाढवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)