या छावण्या नव्हेत, तर हे आहेत विगर मुस्लिमांसाठीचे तुरुंग...बीबीसीचा खास रिपोर्ट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

चीनमध्ये वीगर मुस्लिमांचं तुरुंगात डांबून सुरू आहे सक्तीचं प्रशिक्षण

चीनमधल्या शिनजियांग प्रांतात असलेल्या हजारो छावण्या म्हणजे कडेकोट बंदोबस्त असलेले तुरुंगच आहेत.

आणि तिथे शेकडो-हजारो लोकांना ब्रेनवॉश म्हणजे बुद्धिभेद करण्यासाठी ठेवण्यात आलंय, असं आता स्पष्ट झालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकारांच्या गटाने तसे महत्त्वाचे दस्ताऐवज सादर केले आहेत.

बीबीसीनेही या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. आणि त्यातून हेच स्पष्ट होतं की, या छळ छावण्याच आहेत. आणि इथल्या लोकांना डांबून ठेवण्यात आलंय, त्यांचा छळ होतोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)