CAA JAMIA: पोलीस कारवाईत डोळा गमावल्याचा विद्यार्थ्याचा आरोप - पाहा व्हीडिओ

CAA JAMIA: पोलीस कारवाईत डोळा गमावल्याचा विद्यार्थ्याचा आरोप - पाहा व्हीडिओ

पोलीस हल्ल्यामुळे डोळा गमावला असा आरोप जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थी मिनहाजुद्दीन यांनी केला आहे.

"मला असं कधीच वाटलं नव्हतं, पोलीस लायब्ररीमध्ये येऊन विद्यार्थ्यांना मारहाण करतील," असं ते म्हणतात.

जामियामध्ये 15 डिसेंबरला पोलिसांच्या कारवाईदरम्यान मिनहाजुद्दीन यांच्या डोळ्याला दुखापत झाली.

दुखापतीमुळे डाव्या डोळ्यानं काहीच दिसत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पोलिसांनी मात्र मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

"आवश्यक तेवढ्याच बळाचा वापर करण्यात आला आहे. याचा वापर विद्यार्थ्यांविरोधात करण्यात आला नाही," असं मत दक्षिण-पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)