ही मुलं म्हणतात, 'आम्हाला आत्महत्या करायचीये'

ही मुलं म्हणतात, 'आम्हाला आत्महत्या करायचीये'

“ही चिमुकली मुलं आम्हाला आत्महत्या करायची असं म्हणतील, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं,” लहान मुलांच्या मानसोपचार तज्ज्ञ अॅजेंला सांगतात.

अगदी बालवाडीतली मुलं आपली डोकं भिंतीवर आपटतात, स्वतःचे केस ओढतात. जरा वय वाढलं, 12-17 वर्षांचं वय झालं की मुलं स्वतःला जखमा करायला लागतात, आत्महत्येचा विचार बोलून दाखवतात.

गेल्या तीन महिन्यात त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नाच्या 2 तर स्वतःला दुखापत करून घेण्याच्या 20 केसेस पाहिल्या आहेत. इथे शाळा चालवणारे झेक्रिया फर्जंद सांगतात की, इथे मुलांना नीट वागवलं जात नाही. या निर्वासितांच्या शिबिरातली परिस्थिती गंभीर आहे, आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो.”

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)