CAA Mumbai Protest: ‘मला भीतीखाली नाही जगायचं, म्हणून मी आंदोलनात सहभागी झाले’ - पाहा व्हीडिओ

CAA Mumbai Protest: ‘मला भीतीखाली नाही जगायचं, म्हणून मी आंदोलनात सहभागी झाले’ - पाहा व्हीडिओ

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या मुंबईतल्या आंदोलनात आम्हाला शेफाली व्यास भेटल्या.

"मी दिल्लीची आहे. मी जामिया मिलियामधून शिक्षण घेतलं आहे. आता मी मुंबईत काम करते. गेल्या आठवड्यात जामियात जे झालं, त्यामुळे मला भीती वाटत आहे. पण, मला भीतीखाली नाही जगायचं, म्हणून मी इथं आले आहे."

"सर्वांना माहिती आहे की, बेरोजगारी आहे, महागाई आहे. कांद्याचे दर प्रतिकिलो 140 रुपयांच्या वर पोहोचलेत. दुधाची किंमत वाढलीय. याविषयी कुणीच बोलणार नाही. लोक फक्त या गोष्टींमध्ये अडकून पडतील. आता कुठे आम्ही याविषयी बोलत आहोत. याचा आनंद आहे," असं त्या पुढे म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)